Wed. Nov 25th, 2020

यवतमाळ जिल्ह्यात 40 जण कोरोनामुक्त ; 49 नव्याने पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यु

यवतमाळ जिल्ह्यात 24 तासात जिल्ह्यात 49 जण नव्याने पॉझिटिव्ह…

यवतमाळ, दि. 22 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 40 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर 24 तासात जिल्ह्यात 49 जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून एकाचा मृत्यु झाला आहे.

मृतकामध्ये यवतमाळ शहरातील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 1452 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 49 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1403 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 304 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11040 झाली आहे. 24 तासात 40 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10350 आहे. तर जिल्ह्यात एकूण 364 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 103565 नमुने पाठविले असून यापैकी 101596 प्राप्त तर 1969 अप्राप्त आहेत. तसेच 90557 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *