Wed. Jun 16th, 2021

यवतमाळ जिल्ह्यात 53 नव्याने पॉझेटिव्ह ; 32 जण बरे तर एकाचा मृत्यु

जिल्ह्यात 24 तासात 53 जण नव्याने पॉझेटिव्ह…

यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात 24 तासात जिल्ह्यात 53 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 20 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तसेच जिल्ह्यात एका कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे.

मृतकांमध्ये दारव्हा येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 2122 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 53 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 2069 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 346 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11115 झाली आहे.

24 तासात 32 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10402 आहे. तर जिल्ह्यात एकूण 367 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 106946 नमुने पाठविले असून यापैकी 105081 प्राप्त तर 1865 अप्राप्त आहेत. तसेच 93966 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *