Tue. Aug 9th, 2022

यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह 79 नव्याने पॉझेटिव्ह 68 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यात 24 तासात एका मृत्युसह 79 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 68 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 15) एकूण 506 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 79 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 427 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 460 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13544 झाली आहे. 24 तासात 68 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12670 आहे. तर जिल्ह्यात एकूण 414 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 131811 नमुने पाठविले असून यापैकी 131426 प्राप्त तर 385 अप्राप्त आहेत. तसेच 117882 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.