Wed. Oct 5th, 2022

यवतमाळ जिल्ह्यात 59 जण नव्याने पॉझेटिव्ह, 52 कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 21 : जिल्ह्यात 24 तासात 59 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 52 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 504 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 59 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 445 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 401 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13811 झाली आहे. 24 तासात 52 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12988 आहे. तर जिल्ह्यात एकूण 422 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 133635 नमुने पाठविले असून यापैकी 133259 प्राप्त तर 376 अप्राप्त आहेत. तसेच 119448 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.