Mon. Apr 19th, 2021

यवतमाळ जिल्ह्यात 87 जणांची कोरोनावर मात ; 28 नव्याने पॉझेटिव्ह

दिवसभरात आढळले २८ नवीन रुग्ण…

यवतमाळ, दि. 7 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 87 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 28 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 319 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 28 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 291 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 328 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10487 झाली आहे. आज 87 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9399 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 351 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 94180 नमुने पाठविले असून यापैकी 93782 प्राप्त तर 398 अप्राप्त आहेत. तसेच 83295 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *