Sun. Jun 20th, 2021

कोविड सेंटरमधून २० कोरोनाबाधितांचे पलायन

यवतमाळ: कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सरकार, तसेच प्रशासन प्रयत्न करत असताना काही नागरिक मात्र आपल्या बेजबाबदारपणामुळे संकटाला आमंत्रण देत आहेत. यवतमाळमधील घाटंजी येथे असाच एक प्रकार घडला आहे.घाटंजी येथील तब्बल २० कोरोनाबाधित रुग्णांनी पलायन केल्याचे समोर आले.

आयटीआय महाविद्यालयामध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये हा प्रकार घडला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी घाटंजी पोलीस स्थानक गाठून तक्रार दाखल केली आहे. दरम्यान संबंधितकोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

या पलायन केलेल्या कोरोनाग्रस्तांमुळे परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *