Tue. Jun 15th, 2021

दारूचं व्यसन ठरलं जीवघेणं

यवतमाळ: दारू प्यायला मिळाली नाही म्हणून व्यसन भागवण्यासाठी सॅनिटायझर पिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील हा प्रकार असून सॅनिटायझरच्या सेवनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे,तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

कोरोना परिस्थितीत असलेल्या निर्बंधांमुळे दारूची दुकाने बंद आहेत. त्यामुळे दारूचे व्यसन असलेल्यांना दारू मिळणे अवघड झाले आहे. अशात वणीतील काही व्यक्तींनी दारूचे व्यसन भागविण्यासाठी सॅनिटायझरचा पर्याय निवडला.

या प्रकरणात सुनील महादेव ढेंगळे, गणेश उत्तम शेलार, दत्ता लांजेवार, नूतन पाथरकर,संतोष मेहर, गणेश नांदेकर आणि अन्य एक अशा सात जणांचा मृत्यू झाला आहे. सॅनिटायझर पिल्यानंतर ह्या व्यक्तींच्या छातीत त्रास सुरू झाला. असह्य वेदना होत असल्याने तिघांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य चौघांचा घरीच मृत्यू झाला.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *