Sun. Jun 16th, 2019

नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात अखेर वनविभागाला यश

0Shares

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात 13 शेतमजुरांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला अखेर ठार करण्यात आलं आहे. टी-1 वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते.

अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमने या नरभक्षक वाघिणीला ठार केलं आहे. या वाघिणीने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता.

नरभक्षक टी-1 वाघीण अखेर ठार

  • काल रात्री 12 च्या सुमारास टी-1 वाघिणीचा शोध सुरू होता.
  • त्यावेळी शोध पथकाला वाघिण दिसली. तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला असता वाघिणीने उलटून हल्ला केला
  • त्यावेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी शार्प शूटर असगर अलीने तिच्यावर गोळ्या झाडल्या, यामध्ये तिचा मृत्यू झाला.

मात्र आता टी-1 वाघिणीच्या 11 महिन्यांच्या 2 बछड्यांना शोधण्याचं आव्हान वन विभागासमोर आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *