Jaimaharashtra news

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील तब्बल 10 अभ्यासक्रमांची मान्यता रद्द!

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यापीठांवर उच्च शिक्षण व तंत्रशिक्षणासंदर्भात लादलेल्या जाचक अटींच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरात नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठातील (YCMOU) पदवी व पदव्युत्तर पदवीच्या तब्बल दहा अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केली आहे.

कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि इतर तांत्रिक कारणांचा दाखला देत UGC ने ही कारवाई केली आहे.

अशाप्रकारे मुक्त विद्यापीठात 2011 पासून सुमारे 30 ते 40 अभ्यासक्रम बंद केले गेले आहेत.

अशा जाचक नियम अटींमुळे दुरस्थ शिक्षण पद्धतीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी व्यक्त केलंय.

एकीकडे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक गुणवत्ता व आधुनिक कार्यप्रणालीसाठी गौरव होतोय, तर दुसरीकडे UGC च्या जाचक निकषांमुळे विद्यापीठाला अभ्यासक्रमच बंद करावे लागले आहेत.

समाजातील वंचित, उपेक्षितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने YCMOU ची स्थापना झाली होती.

‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे या मुक्त विद्यापीठाचं ब्रीदवाक्य आहे. मात्र विद्यापीठाची ही उद्दिष्ट्यं साध्य होण्यात अडसर निर्माण होत असल्याची तक्रार आता होत आहे.

Exit mobile version