Tue. Feb 18th, 2020

कर्नाटकात पुन्हा येडियूरप्पा सरकारची बाजी; बहुमत केलं सिद्ध

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात राजकीय नाटक सुरू असून कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर भाजपाचे येडियूरप्पा यांनी सत्ता स्थापन केली. मात्र शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएसचे -3 तर कॉंग्रेसचे 11 एकूण 14 बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. त्याचबरोबर यापूर्वी 3 आमदारांना अपात्र घोषित करण्यात आले होते. यामुळे येडियूरप्पा सरकारने बहुमत सिद्ध केलं असून येडियूरप्पा सरकारने पुन्हा बाजी मारली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

कर्नाटकात कुमारस्वामी यांचं सरकार कोसळ्यानंतर भाजपाचे येडियूरप्पा यांनी सत्ता स्थापन केली.

मात्र विधानसभा अध्यक्ष के.आर रमेशकुमार यांनी जेडीएस आणि कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले.

आता एकूण 17 अपात्र आमदारांची संख्या झाली.

त्यामुळे येडियूरप्पा सरकारला सोमवारी बहुमत सिद्ध करावे लागणार होते.

येडियूरप्पा सरकारने ध्वनी मतानं बहुमत सिद्ध केलं असून पुन्हा येडियूरप्पा सरकारने बाजी मारली आहे.

बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर अध्यक्षांनी चालूपणा केला नसल्याचे म्हटलं आहे.

त्याचबरोबर 15व्या विधानसभेची मुदत संपपर्यंत अपात्र आमदार निवडणूक लढू शकणार नसल्याचेही म्हटलं.

सध्या विधानसभेची सदस्य संख्या 207 झाली असून बहुमातासाठी 104 आमदारांची आवश्यकता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *