Mon. Jul 4th, 2022

येडियुरप्पा कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री

India's ruling Bharatiya Janata Party (BJP) leader B. S. Yeddyurappa flashes the victory sign after taking oath as Chief Minister of the southern state of Karnataka inside the governor's house in Bengaluru, India, May 17, 2018. REUTERS/Abhishek N. Chinnappa

कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचं सरकार कोसळल्यानंतर भाजपाने सत्ता स्थापन करणार असल्याचे दावा केला. भाजपा नेते येडीयुरप्पा यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 14 महिन्यानंतर येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावर दाखल झाले आहे. अनेक दिवसांपासून कर्नाटकात राजकीय नाटक सुरू होते. कुमारस्वामी सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठराव मतदान पार पडल्यानंतर कॉंग्रेस-जेडीएसला 99 मतं पडली तर भाजपाला 105 मतं पडली होती. मात्र बहुमतासाठी 103 आमदारांची गरज होती. त्यामुळे कुमारस्वामी सरकार कोसळले.

कोण आहेत कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री ?

कनार्टकात येडियुरप्पा हा महत्त्वाचा चेहरा आहे.
कर्नाटकात भाजपा रुजवण्यात येडियुरप्पा यांचा मोठा वाटा आहे.
2008 साली कर्नाटकमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री ठरले.
दक्षिणमध्ये भाजप पक्षाचे पहिले मुख्यमंत्री येडियुरप्पा ठरले आहेत.
२०११ मध्ये भ्रष्ट्राचाराच्या आरोपानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
२०११ मध्ये बंडखोरी करुन वेगळा पक्ष स्थापन केला.
आठवेळा शिकारीपुरा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले.

कर्नाटकमध्ये भाजपचे चारवेळा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले.
तिनदा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं.

एकदा विधानपरिषदेवर तर एकदा खासदार म्हणून निवडूून आलेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.