Sun. Jan 16th, 2022

यह फेव्हिकॉल का जोड है, युती तुटणार नाही – मुख्यमंत्री

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप- शिवसेनेच्या युतीची पहिली सभा म्हणजेच युती मेळावा अमरावतीत पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. तसेच या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पाच वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचला. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता पवारांवर घणाघाती टीकाही केली. तसेच ही युती फेव्हिकॉल का जोड है, तुटणार नाही असं बोलत विरोधकांवर टोला लगावला.

यह फेव्हिकॉल का जोड है,युती तुटणार नाही – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी युती मेळाव्यात विरोधकांवर निशाणा साधत युतीसंदर्भात यह फेव्हिकॉल जोड है, तुटणार नाही असे म्हटलं.

तसेच मुख्यमंत्र्यांनी उज्जवला योजना अशा अनेक योजनेमुळे जनतेला लाभ झाल्याचे सांगितले आहे.

उजाला योजनेमुळे घराघरात वीज पोहोचली आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता पवारांवर टीका केली.

तसेच ही युती सत्तेसाठी नसून हिंदूत्ववादीची युती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

युती झाल्यावर अनेक नेत्यांनी माघार घेतली असेही त्यांनी म्हटलं आहे.

पाच वर्षात २० हजार किमीचे महामार्ग बांधल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

तसेच आमच्या काळात गरिबांना सोयी पूरवल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

एका पक्षातील साहेबांनी पंधरा दिवसात माघार घेतली असे म्हटले आहे.

मोदींना मी अजूनही नरेंद्र भाई म्हणतो – उद्धव ठाकरे

भाजप- शिवसेना ही जनतेची शेवटची आशा आहे.

युतीमधला संघर्ष विकासाआड येऊ दिला नाही.

योजना उत्तम आहेत मात्र ते जनतेपर्यंत पोहोचवण गरजेचे आहे.

आधी मी हिंदू आहे हे सांगायला भीती वाटायची असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आमचाच पक्ष सामान्यांना तारणारा आहे असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *