Thu. May 6th, 2021

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला नेटकऱ्यांनी धरले धारेवर

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर हे नेहमीच चर्चेत असतात. शिवाय त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा ह्या देखील सुरू असतात. कोरोना काळात कोणी घराच्या बाहेर पडत नाही. सर्वजण घरी बसूनच आपलं काम करतात आहे मात्र ज्यांना खरचं काम आहे ते फक्त बाहेर जात आहे. बॉलिवूडमधील अनेक असे सेलिब्रिटी आहे ज्यांना कोरोनाची भिती राहिलीचं नाही. ‘इतरांना सांगतात घरात बसा अन् स्वत: देशाबाहेर पळतात’; मालदिवला गेलेल्या आलिया-रणबीरवर नेटकरी असा पद्धतीने संतापले आहे.

नुकताच आलिया आणि रणबीर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला यात दोघे ही सोबत मुंबई एरपोर्टवर दिसत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. अर्थात योग्य उपचार घेऊन दोघंही बरी झाली. परंतु त्यावेळी त्यांनी देशभरातील लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता. मात्र स्वत: मालदिवला गेले आहे. त्यामुळे नेटकरी संतापले आहे. काही नेटकऱ्यांनी लिहिलं “हे बॉलिवूडवाले खूप निर्लज्ज आहेत. इतरांना सांगतात घरात बसा अन् स्वत: मात्र देशाबाहेर जाऊन मजा मारतात.” “या पळपुट्या कलाकारांच्या चित्रपटांवर बंदी घाला” अशा आशयाच्या कॉमेंट करुन काही नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला. पिकनिकला जाण्यासाठी आयुष्य पडलं आहे. आता किमान इतरांच्या सुरक्षिततेसाठी तरी घरात बसा असा सल्ला त्यांनी दिला होता. मात्र आता हिच मंडळी चक्क देशाबाहेर पिकनिकला जात आहे. त्यामुळं नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *