योग करा; निरोगी राहा !
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
योग दिनाच्या निमित्ताने देशभारात अनेक नागरिक आज योगा करताना दिसत आहेत. मग यात सेलिब्रिटी कसे मागे राहतील? बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकरांनी योग दिवसात सहभाग नोंदवला.
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात योग दिन शिबिर आयोजित केलं होतं. यावेळी अभिनेत्री मलाईका अरोरा आणि शायना एनसीही सहभागी झाल्या होत्या.
गेल्या तीन वर्षापासून शायना एनसी योग दिनाच्या शिबिरामध्ये सहभागी होतात. पंतप्रधान मोदींमुळे योगाची परंपरा जगभरात पोहचली त्यांचे खूप आभार अशा भावना शायना एनसीनीं व्यक्त केल्या.