Fri. Jun 5th, 2020

#yogaday2019 पंतप्रधान मोदी यांची 40000 लोकांसोबत योगसाधना

आज जागतिक योग दिनाचा सर्वत्र उत्साह दिसत आहे. देशभरात विविध ठिकाणी योग शिबिरांचं आयोजन केलं गेलं आहे. रांची येथे योगशिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासनं केली.

40,000 लोकांसोबत पंतप्रधानांचा योग!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची मध्ये प्रभात तारा मैदानावर 40,000 लोकांसोबत योगासनं केली.

यासाठी प्रभात तारा मैदानावर मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.

पंतप्रधानांनी एकूण 65 मिनिटं योगासनं केली.

योग ही आपल्या देशाच्या संस्कृतीतील प्राचीन परंपरा आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

आपल्याला आधुनिक योग सर्व स्तरात पोहचवायची आपली मनिषाही यावेळी मोदींनी व्यक्त केली.

गृहमंत्री अमित शहांनी रोहतकच्या मेला मैदानावर योगसानं केली.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये  योगासनं केली.

#YogaDay2019 : पंतप्रधान मोदींमुळे जगाने योग स्वीकारला- मुख्यमंत्री

देशभरात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन  

आज देशभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला.

या निमित्त देशभराच्या विविध ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

यावर्षीच्या योग दिनाची थीम क्लायमेट अॅक्शन होती.

देशाच्या राजधानीत ३०० ठिकाणी योगशिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

अरुणाचल प्रदेशात इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी नदीत उभे राहात योगासनं केली.

#YogaDay2019 : नांदेड मध्ये मुख्यमंत्र्यांचा बाबा रामदेव यांंच्यासह योगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *