Thu. May 19th, 2022

येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये खूप काही होणार – योगी आदित्यनाथ    

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी बिहारमध्ये ‘राम मंदिराची निर्मिती तिथेच होईल जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता.

येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशमध्ये खूप काही होणार आहे. चिंता करू नका, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचे मंदिर त्याच स्थानावर होईल, यात कोणतीच शंका नाही’ असं वक्तव्य केलं आहे.

पूर्णिया येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते त्यावेळी योदी आदित्यनाथ बोलत होते.

‘भगवान रामाच्या जन्मस्थानी येणारे भाविक आता अयोध्येत येतात. फैजाबाद जिल्ह्यात जात नाहीत आणि कुंभ मेळ्याला येणारे प्रयागराजला येतात अलाहाबादला नव्हे.

येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशमध्ये खूप काही होणार आहे. असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

बिहारमध्ये नितीशकुमार आणि सुशील मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारच्या कामगिरीमुळे सामान्य लोकांचे बिहारबाबतच्या धारणेत परिवर्तन झाले आहे.

आम्ही विरोधकांसारखे देश तोडण्याची भाषा करत नाही, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

तसेच आम्ही शहीद होणाऱ्या आमच्या प्रत्येक जवानांसाठी सीमेपलिकडचे 100 सैनिक मारण्यावर विश्वास ठेवतो, असे सांगितले.

यावेळी त्यांनी बिहारच्या नागरिकांना कुंभमेळ्याला जाऊन उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आलेले परिवर्तन पाहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.