Tue. Oct 27th, 2020

दुष्काळनिवारणासाठी योगी खुशीनाथ यांची ‘अशी’ उग्र तपश्चर्या!

उन्हाने अंगाची लाहीलाही होतेय. अशावेळी शिर्डीजवळील नपावाडीतील भैरव मठात मात्र योगी खुशीनाथ मात्र भरदुपारी पाच धगधगत्या धुनींच्या मध्यभागी बसून घोर तपश्चर्या करत आहेत. ही तपश्चर्या सुरू आहे ती राज्यातील दुष्काळ दूर व्हावा आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा यासाठी…

आज राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाण्यासाठी वणवण फिरायची वेळ लोकांवर आलीय.

ही परिस्थिती दूर व्हावी आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा, शेतकऱ्य़ावरील संकट दूर व्हावं, यासाठी शिर्डीतील नपवाडी येथे योगी खुशीनाथ हे तब्बल 41 दिवसांची उग्र तपश्चर्या करत आहेत़.

भर दुपारी 11 ते 2 वाजेपर्यंत पाच धगधगत्या धुनीमध्ये बसून ध्यान करत आहेत.

कशी करतात योगी खुशीनाथ तपश्चर्या?

योगी खुशीनाथ प्रथम अंघोळ करतात.

मग संपूर्ण जटा आणि अंगाला भस्मलेपन करतात.

त्यानंतर शंखध्वनी सुरू असतांना चोहोबाजूंनी गोवऱ्यांनी रचलेल्या धुनींतून मुख्य धुनीत एकएक पेटती गोवरी ठेवतात आणि सर्व धुनींचं पूजन करून तपश्चर्येला बसतात.

तपश्चर्याचा पहील्या दिवशी प्रत्येक धुनीत 49 गोवऱ्या ठेवल्या जातात.

त्यानंतर प्रत्येक दिवशी प्रत्येक धुनीत 5 गोवऱ्यांची वाढ करण्यात येते़.

शेवटच्या टप्प्यात धुनी डोक्याच्याही वर जाते आणि त्यांची धग शंभर फुटावरही माणसाला उभं राहू देत नाही.

गेल्या तीन वर्षांपासून मे महिन्याच्या कडक उनळ्यात योगी खुशीनाथ ही तपश्चर्या करत आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा आणि शेतकरी सुखी समृद्धी राहो हीच प्रार्थना देवाकडे करत असल्याचं योगी खुशीनाथ यांचं म्हणणं आहे.

 

कोण आहेत योगी खुशीनाथ?

योगी खुशीनाथ हे हरीद्वारच्या नाथ आखाड्याचे आहेत.

नाशिकच्या कुंभमेळ्यात योगी खुशीनाथ यांना 12 वर्षासाठी शिर्डी जवळील नपावाडी येथील कालभैरव मंदिराचे मठाधीश पद देण्यात आलंय.

खुशीनाथ गेल्या तीन वर्षांपासून प्रत्यक उन्हाळ्यात 41 दिवसांची घोर तपश्चर्या करतात.

यंदाचं वर्ष खुशीनाथ यांच्य़ा तपश्चर्येचं चौथं वर्ष आहे.

गेल्या 21 एप्रिल पासून ते 31 मे पर्यंत ही कठोर योगसाधना सुरू राहणार आहे.

चार वर्षा पूर्वी नपावाडीतील पंच कृषीत पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्तिथी निर्माण झाली होती.

त्यावेळी योगी खुशीनाथ यांनी दुष्काळ दूर व्हावा आणि चांगला पाऊस पडावा यासाठी तपश्चर्या सुरू केली.

त्यावेळी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पाण्याची बिकट परिस्थिती दूर झाली.

यामुळे खुशीनाथ यांनी दरवर्षी मे महिन्यात ही तपश्चर्या सुरू केली आहे.

यंदाच्या वर्षीही मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

खुशीनाथ यांच्या तपश्चर्येने नक्कीच दुष्काळ दूर होईल आणि पाऊस ही मोठ्या प्रमाणात होईल, असा नपावाडीच्या ग्रामस्थांना विश्वास आहे.

दररोज मोठ्या प्रमाणात भाविक खुशीनाथ यांच्या दर्शांनासाठी हजरी लावत असून खुशीनाथ यांची कडक उन्हात आणि पाच धगधगत्या धुनींच्या मध्यभागी बसुन सुरू असलेली तपश्चर्या पाहून प्रत्यक जण हैराण होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *