योगी मंत्रिमंडळातील चेहऱ्यांची यादी ठरणार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपाने बहुमताने विजय मिळवला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये नवीन मंत्रीमंडळ आणि सरकार स्थापनेसाठी भाजप पक्षाच्या बैठका पार पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्ली दौरा करणार आहेत. दिल्लीतील या महत्तवाच्या बैठकीत योगी मंत्रिमंडळातील चेहऱ्यांची यादी ठरणार आहे.
योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असले मात्र तरीही योगी मंत्रिमंडळातील इतर पदांवर कोणाला स्थान मिळेल हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे याचपार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांची दिल्लीला महत्तवाची बैठक पार पडणार असून मंत्रिमंडळातील चेहऱ्यांची यादी ठरणार आहे.
या बैठकीसाठी उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, संघटन मंत्री सुनील बन्सल, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य दिल्लीला पोहचले आहेत. तसेच या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.