Jaimaharashtra news

‘यॉर्कर किंग’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

श्रीलंका संघातील प्रसिद्ध गोलंदाज लसिथ मलिंगा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मलिंगा बांगलादेशविरोधात होणाऱ्या पहिल्या वन डे सामन्यानंतर निवृत्ती घेत असल्याचे म्हटलं आहे. यॉर्कर किंग म्हणून लसिथ मलिंगाला ओळख मिळाली आहे.

यॉर्कर किंगची निवृत्ती –

2011 साली लसिथ मलिंगाने कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतली.

आता मलिंगा बांगलादेशसोबत शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे.

लसिथ मलिंगा यांनी वन डे सामन्यातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.

श्रीलंका संघामधून सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा ठरला आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांच्या वन डे मालिकेला २६ जुलैपासून सुरुवात होत आहे.

 

Exit mobile version