Jaimaharashtra news

इंजिनही भाड्याने मिळतंय; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारसभा घेत असून साताराचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर खरमरीत टीका केली. राष्ट्रवादीला प्रचारासाठी माणसं आयात करवी लागत आहेत. तसेच यापूर्वी स्कूटर, सायकल मोटारगाडी भाड्याने घ्यावी लागत होती. मात्र आता चक्क रेल्वे इंजिन भाड्याने मिळू लागली असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

साताऱ्यातील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रचारासाठी माणसं आयात करावी लागत आहेत.

यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्कूटर, सायकल, मोटारगाडी भाड्याने घेतली.

मात्र आता रेल्वे इंजिन भाड्याने मिळत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे बारामतीचे पोपट असल्याची टीका मुख्यमंत्री करत होते.

तसेच त्यांच्या स्क्रिप्टही बारामतीमधून येत असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष लोकसभा निवडणूक लढत नसल्याने तरीही राज ठाकरे जाहीर सभा घेत असल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे.

Exit mobile version