Wed. Dec 11th, 2019

अमेरिकेत ‘इथे’ चप्पल आणि स्लीपर्स घालून येणास बंदी !

अमेरिकेतील ग्रीनविच शहरातील महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांसाठी एक अजब नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑफिसमध्ये येताना कर्मचाऱ्यांनी चप्पल किंवा स्लीपर्स घालू नये असे नियम लागू करण्यात आला आहे. हा नियम 1 जूनपासून लागू करण्यात आला आहे. महानगरपालिकेनुसार हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी घेण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.

नेमका काय आहे हा निर्णय ? 

अमेरिकेच्या ग्रीनविच शहरातील महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना ऑफिसला चप्पल आणि स्लीपर्स न घालण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी घेतला असल्याचे म्हटलं जात आहे.

हा नियम 1 जूनपासून लागू करण्यात आला आहे.

स्लीपरमुळे अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे काही जखमाही होतात.

कधी कधी माणूस आजरी पडतो आणि त्या कराणावरून सुट्ट्या आणि मेडिकल क्लेम करतो.

हे सर्व टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

विशेष म्हणजे या निर्णयाला कर्मचार्यांकडूनही पाठींबा मिळतोय, असे मेरी यांचे म्हणणे आहे.

चप्पल, स्लीपर्स घालण्यास बंदी असली तरीही समुद्रकिनारी असणारे सुरक्षारक्षक, कॅंप, स्विमिंगपूल अधिकाऱ्यांना    निर्णयातून वगळण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *