Tue. Jan 18th, 2022

‘तुम्ही माझं काही करू शकणार नाही, मी सर्वांना पुरून उरलोय’

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलास दिल्यानंतर लगेचच राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले की, मी असे काय बोललो होतो ज्याचा राग आला. मी आता ते पुन्हा बोलणार नाही, असे सांगतानाच भुतकाळात जी घटना घडली त्याची मी माहिती दिली तो गुन्हा कसा काय होतो? असा सवाल राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी देशाबाबत जे वक्तव्य केले ते मला सहन झाले नाही. म्हणून मी तसे बोलल्याचे सांगत त्यांनी आपल्या वक्तव्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत आव्हानही दिले आहे. माझ्याविरोधात जे जे गुन्हे दाखल झाले होते, त्याबाबत निकाल लागलेला आहे. दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागलेले आहेत. याचा अर्थ देश कायद्याने चालतो आहे हे सिद्ध झाले आहे, असे सांगत त्यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईवर भाष्य केले आहे.

तुम्ही माझे काहीही करू शकत नाही, तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही, मी तुम्हाला पुरून उरलो आहे, असे सांगतानाच तुम्हाला काय करायचे आहे ते करा पोलिस पाहून घेतील, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना किंवा आघाडी सरकारचे नाव न घेता हे वक्तव्य केले आहे. १७ सप्टेंबरपर्यंत आपण या प्रकरणावर अधिक भाष्य करणार नसल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *