केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलास दिल्यानंतर लगेचच राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले की, मी असे काय बोललो होतो ज्याचा राग आला. मी आता ते पुन्हा बोलणार नाही, असे सांगतानाच भुतकाळात जी घटना घडली त्याची मी माहिती दिली तो गुन्हा कसा काय होतो? असा सवाल राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी देशाबाबत जे वक्तव्य केले ते मला सहन झाले नाही. म्हणून मी तसे बोलल्याचे सांगत त्यांनी आपल्या वक्तव्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत आव्हानही दिले आहे. माझ्याविरोधात जे जे गुन्हे दाखल झाले होते, त्याबाबत निकाल लागलेला आहे. दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागलेले आहेत. याचा अर्थ देश कायद्याने चालतो आहे हे सिद्ध झाले आहे, असे सांगत त्यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईवर भाष्य केले आहे.
तुम्ही माझे काहीही करू शकत नाही, तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही, मी तुम्हाला पुरून उरलो आहे, असे सांगतानाच तुम्हाला काय करायचे आहे ते करा पोलिस पाहून घेतील, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना किंवा आघाडी सरकारचे नाव न घेता हे वक्तव्य केले आहे. १७ सप्टेंबरपर्यंत आपण या प्रकरणावर अधिक भाष्य करणार नसल्याचेही ते म्हणाले.
आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरून…
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अखेर राजीनामा दिलाय. बिहारमध्ये 5 वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू…
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. त्यांनी आतापर्यंत…
राज्यात मोठ्या सत्तांतरणानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाने नवे सरकार स्थापन झाले. या…
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असल्यापासूनच एकाही महिलेचे नाव चर्चेत नव्हते. शिंदे-फडणवीस सरकारकडून अचानक धक्का दिला…
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला आहे. एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची…