Mon. Aug 15th, 2022

‘तुम्ही संख्याबळ गमावलंय, सत्ताबदल स्विकारा’

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकरला आहे. शिवसेनेतील 55 आमदारांनी बंड पुकारला आहे. शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. तर, हिंदुत्वापेक्षा मुख्यमंत्रीपद मोठे नसल्याची प्रतिक्रिया बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, बंडात सामील असेलेल शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘महाराष्ट्रात नवी सत्ता येणार’

बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रात सत्ताबदलाचे संकेत दिले आहेत. शिंदे गटाचा पहिला आमदार दीपक केसरकर यांनी थेट ठाकरेंना सांगितले की, ‘तुम्ही संख्याबळ गमावलं असून आता खुल्या मनाने सत्ताबदल स्विकारा.’ तसेच पक्षप्रमुख आणि राज्याचे प्रमुख असताना भूमिका वेगळी असा घणाघात बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच 15 जणांचं 55 लोकांवर राज्य का चालवून घेऊ? असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

दीपक केसरकरांनी सांगितले बंडाचे कारण

बंडखोर दीपक केसरकर यांनी मुलाखतीदरम्यान बंड का पुकारला, याचे कारण सांगितले आहे. माझ्यावर शिवसैनिक पाळत का ठेवली तसेच मी तुमच्यासोबत असतानाही मला नोटीस का दिली? असा सवाल दीपक केसरकर यांनी नेतृत्वाला उपस्थित केला आहे. पक्षासोबत एकनिष्ठ असताना माझ्यावर अविश्वास दाखवल्यामुळे मी गुवाहाटीत आमदारांच्या बंडात सामील झालो असल्याचे दीपक केसरकर म्हणाले.

ठाकरेंनी स्वत:ची प्रतिमा जपावी, मात्र आमची बदनामी का करताय?, असा सवालही बंडखोर केसरकर यांनी उपस्थित केला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप केसरकर यांनी केला आहे. त्यामुळे भाजपासोबत चला हे दीडवर्ष सांगत असल्याचे केसरकर म्हणाले.

‘मी मंत्रिपद मागितले नाही. मात्र, तुमचा हिंसाचार सत्ता टिकवण्यासाठी असल्याचे दीपक केसरकर म्हणाले.’ तर सत्ता जातेय म्हणून हिंसाचार करताय, अशी टीकाही केसरकर यांनी केली आहे. हिंसाचार ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का, असे असल्यास माझ्यावर शिवसैनिकांना का सोडलं? असा सवाल केसरकर यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे.

बंडखोर केसरकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांचे भाषण चिथावणीखोर असल्याचे केसरकर म्हणाले. तसेच संजय राऊत आमच्यावर हल्ला का करवतायत? आमच्यावर हल्लाबोल करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.