‘तुम्ही मराठी माणसांमध्ये फूट पडली’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहुप्रतिक्षित मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. त्यांना राऊतांनी केलेला सवाल म्हणजे सध्याचं राजकीय वातावरण लक्षात घेता मुंबईचं भविष्य काय असणार?, तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही शिवसेनेचा पराभव करू, मुंबई पालिकेवरील शिवसेनेचा भगवा उतरवला जाईल, असा इशारा भाजपकडून दिला जातोय, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की यापूर्वी देखील या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही, असं अनेकांनी म्हंटलं होतं. पण तसं काही झालं नाही. याआधी हिंदुत्वामध्ये फोडाफोडी करण्याचा प्रयत्न झाला. पण आता मुंबईमध्ये ‘मुंबईकर’ म्हणून सगळे एकत्र झाले आहेत. त्यावेळी यांनी हिंदुत्वात मराठी, अमराठी म्हणत फोडण्याचा प्रयत्न केला होता. मराठीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आजही केला जातोय. मात्र मराठी माणसं एकवटलेली असून तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर माझंही असंच मत आहे की मुंबईच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात. केवळ मुंबईच नाही तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका देखील घ्याव्यात, अशी इच्छा ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवली.
राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. आदित्यच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी उसळत आहे. यांना धडा शिकवायचा हीच चर्चा आहे. तसेच ऑगस्टमध्ये बाहेर पडणार असून गेल्या आठवड्यात जिल्हाप्रमुखांना काही सुचना केल्या आहेत. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जेव्हा मी राज्यात फिरू लागेन तेव्हा सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. त्या दौऱ्यात येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील म्हणून थांबलो आहे. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.