Sun. Jul 5th, 2020

‘इथे’ मिळतं स्वस्तात जेवण, पण त्यासाठी आहे एक ‘सुंदर’ अट!

हॉटेलच्या मेन्यूकार्डवर कितीही पदार्थांची नावं असली, तरी बऱ्याचजणांची पसंती असते ती ‘थाळी’ला. माफक किमतीत घरगुती आणि पोटभर मिळणारा हा पदार्थ. या थाळी व्हेज, नॉन-व्हेज, लिमिटेड, अनलिमिटेड अशा विविध प्रकारच्या थाळी हॉटेलमध्ये मिळतात. गुजराती, राजस्थानी, पंजाबी, साऊथ इंडियन अशा प्रकारच्या थाळीदेखील उपलब्ध असतात. आता तर महाराजा थाळी, बाहुबली थाळी, पेशवाई थाळी अशा कितीतरी व्हरायटी थाळींमध्ये सुरू झाल्या आहेत. मात्र एका ठिकाणची थाळी मात्र ग्राहकांना आकर्षित करतेय.

अवघ्या 60 रुपयांत ‘अनलिमिटेड’!

थाळीमध्ये पुऱ्या किंवा रोटी, विविध भाज्या, कोशिंबिर, डाळ, भात, चटणी, असल्यास एखादा गोड पदार्थ असा तामझाम असतो.

अनलिमिटेड थाळीमध्ये तर तुम्ही हव्या तेवढ्या चपात्या, पुऱ्या पुन्हा पुन्हा मागवू शकता.

भाजी, भात अगदी कोणताही पदार्थ पोटभरेपर्यंत तुम्ही खाऊ शकता. परत परत घेऊ शकता.

आता अमर्याद जेवणाची सोय असेल, तर त्याची किंमत जास्त असणं अपेक्षित असतं.

मात्र रायपूरच्या गजानंद भोजनालयात अवघ्या 60 रुपयांत पोटभर जेवण मिळतं.

आजच्या काळात 60 रुपयांमध्ये अमर्याद भोजन मिळणं किती कठीण आहे?

मात्र गजानंद भोजनालयात तुम्ही हव्या तेवढ्या रोटी, हव्या तितक्यावेला भाज्या, भात वगैरे घेऊ शकतात.

मात्र यासाठी आहे एक अट !

जर तुम्ही अन्नपदार्थ पानात टाकून दिले, तर मात्र तुम्हाला दंड भरावा लागतो.

तुम्ही अन्न मागवलं. खाल्लं आणि नंतर पोट भरल्यामुळे थोडं जरी टाकून दिलं, तरी तुम्हाला त्यासाठी 10 रुपये दंड भरावा लागतो.

या हॉटेलमध्ये ग्राहकांनी टाकून दिलेलं अन्न जनावरांना खायला घातलं जातं.

अन्नपदार्थ तुम्हाला पोटभर खायला मिळतात, याचा तुम्हाला आदर करता आला पाहिजे. हिच भावना लोकांच्या मनात रूजावी, यासाठी हा नियम केला आहे. कमी किमतीत मुबलक मिळतंय, म्हणून अन्नाचं कुणी अवमूल्यन करू नये, हा त्यामागचा हेतू आहे.

असाच नियम जर सर्वत्र केला गेला, तर निश्चितच लोक त्यांना हवं तेवढंच आणि अन्नाचा आदर करून जेवतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *