Tue. Oct 26th, 2021

‘जैश’वर आधी कारवाई करा; इम्रान खानच्या घटस्फोटीत पत्नीचा हल्लाबोल

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशसह जगभरात या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. भारताकडे पुरावा नसताना पाकिस्तानवर आरोप लावला जातो असे पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. मात्र आता चक्क इम्रान खान यांची घटस्फोटीत पत्नी रेहम खान इम्रान खानला सुनावले आहे. भारताकडे पुरावे मागण्यापेेक्षा जैश वर कारवाई कर असे इम्रान खानला सुनावले आहे. ‘जे त्याला शिकवलं जातं तेच तो बोलतो’ असाही हल्लाबोल त्यांच्या पत्नीने केला आहे.

मेहर खान काय म्हणाली ?

भारताकडे पुरावे मागण्यापेक्षा जैश वर कारवाई कर असे रेहमने  म्हणाली.

तसेच इम्रान खान म्हणजे पाकिस्तानी सैन्याचा पोपट असल्याचाही आरोप लावला आहे.

इम्रान खान जे स्पष्टीकरण दिले ते सैन्याच्या आदेशानुसारत दिले आहे.

इम्रान खान हा सैन्याच्या आर्शिवादानेच आल्याचा सांगितले.

जैशने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

जैशचा पाकिस्तानशी संबंध नसल्याने त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही.

जे त्याला शिकवलं जातं तेच तो बोलतो’ असाही हल्लाबोल त्यांच्या पत्नीने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *