Mon. Jul 22nd, 2019

विवेक ओबेरॉयच्या ‘त्या’ मीमवर बिग बींचे प्रत्युत्तर

0Shares

Exit Poll जाहीर झाल्यानंतर यंदाही मोदी आणि भाजपा सरकार सत्ता स्थापन करणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. 23 मे रोजी मतमोजणी होणार असून सगळ्यांचे लक्ष याकडे लागले आहे. राजकीय नेत्यांसह दिग्गज कलाकारही निकालाची वाट बघत आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एश्वर्या राय बच्चन आणि लोकसभा निवडणूकीचा निकालबाबत पोस्ट करण्यात आली. या पोस्टमुळे विवेक ओबेरॉय प्रचंड ट्रोल झाला. या पोस्टवर बिग बी अमिताभ बच्चन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अमिताभ बच्चन यांचे प्रत्युत्तर ?

अभिनेता विवेक ओबेरॉयने ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली.

या पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

या पोस्टमध्ये विवेकने एश्वर्या राय बच्चन आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पोस्ट शेअर केली आहे.

त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांनी विवेक ओबेरॉयला चांगलेच उत्तर दिले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करताना डोकं शांत ठेवावे तसेच त्याबाबत विचार करावा असे ट्विटरवर पोस्ट केले आहे.

विवेक ओबेरॉय यांचे नेमके पोस्ट काय ?

विवेक ओबेरॉयने पोस्टमध्ये ‘ओपिनियन पोल’मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघांचा फोटो आहे.

त्यानंतर ‘एक्झिट पोल’मध्ये स्वत:चा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा फोटो ठेवला.

सर्वात शेवटी ‘रिझल्ट्स’मध्ये अभिेषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा फोटो ठेवला आहे.

ही पोस्ट एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून यामुळे विवेक ओबेरॉय सोशल मीडिया प्रचंड ट्रोल झाला.

राष्ट्रीय महिला आयोगाने विवेक ओबेरॉयला नोटीसही बजावली आहे.

विवेक ओबेरॉयने या पोस्टसाठी माफी मागितली असून पोस्टही डिलीट करण्यात आली आहे.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: