Fri. Jun 21st, 2019

बिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का?

0Shares

तंटामुक्तीसाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात. मात्र सिंधुदुर्गात एक असं गाव आहे. जिथे अनेक दशकापासून तंटामुक्ती सोबतच दारूबंदी आहे. विशेष म्हणजे या गावात तंटामुक्तीसाठी चहा विक्री केली जात नाही.

कोणत्याही गावात एखादी तरी चहाची टपरी असतेच. मात्र वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गाव याला अपवाद आहे.

नेमकं काय घडलं होतं?

मातोंड गावात दीड दोनशे वर्षांपूर्वी एका चहाच्या टपरीवर दोन गटात वाद झाला.

त्यामुळे पुढे वाद टाळण्यासाठी गावातील जुन्या जाणत्या मंडळींनी गावात चहा विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे चहा सोबतच गावात दारू विक्री देखील बंद करण्यात आली.

राज्यात दहा वर्षांपूर्वी तंटामुक्ती अभियानाला सुरुवात झाली. मात्र मातोंड गावाची गेली अनेक दशकांपासून तंटामुक्ती झाली आहे. तर सरकारसाठी सध्या आव्हान ठरणारा दारूबंदीचा प्रश्न देखील मातोंड गावात दीड दोनशे वर्षांपूर्वी सोडवण्यात आला आहे

सामाजिक बदलासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. मात्र त्यांची अमंलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे मातोंड गावाचा आदर्श इतरांनीही घेतला. तर सरकारी हस्तक्षेपशिवाय समाजसुधारणा व्हायला वेळ लागणार नाही.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: