PUBG, मोबाइल आणि आत्महत्या…

ऑनलाइन PUBG गेम खेळण्यावरुन एका तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात  एका 18 वर्षीय तरुणाला PUBG खेळण्यासाठी  Mobile न घेऊ दिल्याने त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नदीम असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

का केली आत्महत्या ?

कुर्ला स्थानक पूर्वेला असलेल्या वर्षा आदर्श सोसायटीत नदीम राहत होता.

आई, भाऊ नईम, वहिनी आणि बहिण असा त्याचा परिवार होता.

नदीम आपल्या भावाकडे PUBG खेळण्यासाठी महागडा Mobile मागत होता.

भावाने त्याला 20 हजार रुपये दिले.

मात्र नदीमला 37 हजारांचा महागडा Mobile च हवा होता.

या Mobileमध्ये PUBG गेम डाउनलोड करून त्याला खेळायचा होता.

आधीच्या Mobileमध्येही तो सतत PUBG खेळत राहायचा.

मात्र त्या Mobileमध्ये कमी स्पेस असल्याने त्याला महागडा Mobile पाहिजे होता.

आत्महत्येपूर्वीही PUBG च!

रात्री 2 वाजता त्याच्या भावाने खेळ बंद करून झोपण्यास त्याला सांगितले होते.

मात्र सकाळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याच्या बहिणीच्या निदर्शनास आले.

शुक्रवारी सकाळी 4च्या सुमारास ही घटना घडली.

घरातील किचनमध्ये त्याने ओढणीच्या साहाय्याने  पंख्याला लटकून आत्महत्या केली.

भावाने नेहरूनगर पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णलयात पाठवले.

त्याचे पोस्ट मॉर्टेम झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नदीमने खरंच PUBG खेळण्यावरून आत्महत्या केली का, याचा तपास पोलीस करत आहे.

Exit mobile version