Thu. Sep 29th, 2022

‘त्या’ चुकीच्या संदेशामुळे युवकांची फसवणूक

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर नाशिकमधील देवळालीत लष्कर भरती होत असल्याचा संदेश सर्वत्र पसरत होता. त्यामुळे लष्करी भरतीसाठी देशभरातून अनेक युवकांनी नाशिक गाठले. मात्र, येथे आल्यावर युवकांच्या लक्षात आले की, समाजमाध्यमांवर चुकीचा संदेश पसरला आणि या संदेशाला देशभरातील युवक बळी पडले.

काय आहे प्रकरण?

नाशिकमधील देवळालीत लष्कर भरती होत असल्याचा चुकीचा संदेश गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर प्रसारित होत होता. युवकांनी या संदेशाची शहनिशा न करता या संदेश पुढे प्रसारित केला. आणि याच संदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील युवक देवळालीत हजर झाले. मात्र तेथे आल्यावर त्यांना कोणतीही भरती नसल्याचे सांगण्यात आले.

नाशिकमधील देवळालीत मोठ्या प्रमाणावर युवकांनी हजेरी लावली. मात्र चुकीच्या संदेशामुळे या युवकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. देशभरातून नाशिकमध्ये आलेल्या युवकांची राहण्याची, खाण्याची सोय नसल्याने युवकांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच अनेक युवक रेल्वे स्थानकावरच रात्र काढत माघारी फिरले आहेत.

संदेश

देशभरातील युवकांची झालेली फसवणूक पाहता, एक संदेश पुढे येतो तो म्हणजे, कोणत्याही गोष्टींची शहनिशा न करता त्यावर विश्वास ठेवू नये. अफवांवर विश्वास ठेवून आज युवकांना मनस्ताप सहन करावा. समाजमाध्यमांवर आलेली प्रत्येक गोष्ट ‘सत्य’च असेल असे नाही, त्यामुळे कोणत्याही  गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी त्या गोष्टींची योग्य चौकशी, शहनिशा करावी.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.