PUBG च्या व्यसनापायी तरुणांनी केली महिलेला मा.रहा’ण!

तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय असणाऱ्या PUBG या गेममुळे अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत. कल्याण शहरानजिकच्या ठाकुर्ली येथे नुकतीच अशी दुर्घटना घडली. पबजी खेळणाऱ्या तरुण तरुणींनी आपल्या इमारतीतील एका महिलेला मारहाण केली.
PUBG चा असर, माणुसकीचा विसर!
आरोपी मुलं इमारतीच्या जिन्यात रात्रंदिवस पबजी खेळत.
त्यांच्या रात्री अपरात्री गेम खेळताना होणाऱ्या गोंधळाला इमारतीत राहणाऱ्या महिलेने विरोध केला.
मात्र PUBG च्या आहारी गेलेल्या तरुणांनी कोणताही मान न राखता चक्क या महिलेला मारहाण केली.
एका गेमपायी आपल्याच इमारतीत शेजारी राहाणाऱ्या महिलेवर हात उगारण्यासही या मुलांनी मागेपुढे पाहिलं नाही.
यावरून PUBG गेमचं व्यसन किती जालीम होत चाललंय, हे दिसून येतंय.
पोलिसांनी या तरुणांविरोधात आता गुन्हा नोंदवला आहे.