Fri. Dec 3rd, 2021

अमरावतीत पोलीस कोठडीतच तरुणाची आत्महत्या

अमरावती : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्ह्यात २५ वर्षीय आरोपीने अमरावती शहरातील राजपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीतच शर्टच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.४ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याची फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. यावेळी फ्रेजरपुरा पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील सागर ठाकरेवर गुन्हा दाखल केला. १७ ऑगस्ट रोजी सागर ठाकरे आणि अल्पवयीन मुलगी दोघेही फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये स्वत: आले आणि यावेळी सागरला अटक करण्यात आली. मुलीला आईच्या स्वाधीन करण्यात आले.
यावेळी आरोपी सागर ठाकरेला १८ तारखेला अमरावती न्यायालयात हजर केले असता त्याले न्यायालयाने २० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली. सागर पोलिस कोठडीत असताना गुरुवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस कोठडीत त्याने आपल्या शर्टाने गळफास घेवून आत्महत्या केली.पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांचे पोलीस ठाण्यात दुर्लक्ष असल्याने आता अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. याचा तपास स्थानिक अमरावती सीआयडी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *