Wed. Jan 26th, 2022

लोकल मधून पडून तरुण जखमी

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावर रेल्वेतून पडून जखमी-मृत्यू होण्याचे सत्र सुरुच आहे. डोंबिवली-दिवा दरम्यान रेल्वेतून पडून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना घडली आहे.

रेल्वेतून पडून तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी तरुणावर मुंबईत उपचार केले जात आहे. आज (बुधवार) सकाळची 10 ची घटना आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे. कसाऱ्याहून ही लोकल मुंबईच्या दिशेने जात होती.

यावेळेस गायकवाड नावाचा तरुण रेल्वेतून पडला. त्यानंतर जखमी तरुणावर वन रुपी क्लिनिकमध्ये प्रथमोपचार करुन अधिकच्या उपचारांसाठी मुंबईत पाठवले आहे.

दरम्यान लोकलमधून पडून जखमी तसेच मृत होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रवाशी संघटनेकडून रेल्वे प्रशासनाचा निषेध केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *