Fri. May 7th, 2021

गर्भवती प्रेयसीसोबत गैरवर्तन; कोर्टाची ही शिक्षा

सिंगापूरमध्ये एका 24 तरुणाने आपल्या गर्भवती प्रेयसीच्या पोटावर लाथ मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिंगापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्या मुलास खडे बोल सुनावले तर त्याला दहा आठवड्यांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुहम्मद मुस्तफा असं या तरुणाचे नाव असून रागावर नियंत्रण नसल्याने त्याने असं कृत्य केल्याचं उघड झालं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

११ जून २०१७ रोजी मुस्तफाचे आपल्या प्रेयसीसोबत भांडण झाले होते.

मुस्तफाची प्रेयसी गर्भवती असून ती मुस्तफाच्या मुलाची आई बनणार आहे.

या दोघांच्यात वाद झाल्याने ती गर्भवती असून देखील मुस्तफाने त्याच्या प्रेयसीला मारहाण केली.

त्याने प्रेयसीच्या पोटावरचं लाथ मारल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रेयसीने पोलिसांत धाव घेत मुस्तफाच्या विरोधात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी सिंगापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला दहा आठवड्यांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *