Mon. Apr 19th, 2021

१६०० किमी चालत तो अखेर पोहोचला घरी, पण कोरोनाच्या भीतीने आईने दारच उघडलं नाही

कोरोनाच्या फैलावामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. देशभरात लॉकडाऊन आहे. यामुळे मुंबईत अडकलेल्या वाराणसीच्या एका तरुणाने आपल्या मित्रांसोबत चालत थेट १६०० किलोमीटरचा प्रवास करून घर गाठलं. मात्र घरी पोहोचल्यावर त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी दारही उघडलं नाही. हे सर्व घडलं कोरोनाच्या भीतीमुळे.

हा तरूण मूळचा उत्तर प्रदेशातील वारणसीचा होता. मुंबईतील नागपाडा परिसरात एका हेलात हा तरुण काम करत होता. कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या बातम्या पसरू लागल्यावर तो घाबरला. लॉकडाऊन सुरू झाल्यावर आपल्याला घरी कधी जायला मिळेल, याने चिंतीत झाला. तेव्हा आपल्या ६ मित्रांसोबत तो वाराणसीला घरी जायला निघाला. मुंबई ते वाराणसी १६०० किलोमीटरचा प्रवास त्याने केला. इतकं चालून चालून त्याची तब्येत बिघडली होती. मात्र अशाही परिस्थितीमध्ये तो घरी पोहोचला.

मात्र एवढं करून जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा तो कोरोनाबाधित असू शकतो या भीतीने त्याच्यासाठी घराचा दरवाजाच उघडला गेला नाही. घरात त्याची आई, भाऊ, वहिनी होते. मात्र त्यांच्यापैकी कुणीही दरवाजा उघडण्याची हिंमत केली नाही. अखेर पोलिसांनी रात्री उशिरा त्याला मैदागिन येथील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तपासणीनंतर हा तरुण आता घरी परतला. त्याला १४ दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितलं आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *