Thu. Jun 20th, 2019

युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

0Shares

इंडिया टीम अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती  घेत आहे. पत्रकार परिषद घेत  युवराज सिंगने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. यावेळी  त्याने आपल्या आई वडिलांचे कौतुक केले . किक्रेटने चांगले मित्र दिले.  किक्रेटमध्ये मला खूप शिकायला भेटले. जीवनात काही अशक्य नाही तसेच क्रिकेटने मला जगायला शिकवले असे त्याने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. खडतर परिस्थितीत आईची साथ मिळाली.ही घोषणा करत असताना युवराज भावूक झाला होता.

निवृत्तीच्या घोषणेनंतर युवराज भावूक

क्रिकेटच्या प्रवासात मला खुप फॅन्स मिळाले आणि अनेक दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

माझ्या करीयरच्या महत्वाच्या टप्यावर असताना मला मोठ्या आजाराला सामोरं जावं लागलं. त्या वेळी मला सर्वांनी खुप सपोर्ट केला.

माझ्या फॅन्सनं आणि डॉक्टरांनीही मला प्रेम दिलं. माझ्या त्या काळातही माझ्या सोबत असणाऱ्या सर्वांचा मी नेहमीच ऋणी राहील.

भारतासाठी ४०० पेक्षा जास्त मॅचेस खेळण्याची संधी मला मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

एवढी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आता पुढे जाण्याची वेळ आलीये. क्रिकेटनं मला आयुष्यात खुप काही दिलंय.

प्रेम आणि द्वेष असं माझं आणि क्रिकेटचं नातं आहे. क्रिकेटमध्ये मी जिंकण्यापेक्षा जास्च वेळा हरलोय, पण मी कधीही हार मानली नाही.

कधीही हार मानायची नाही हे मला क्रिकेटनं शिकवलंय.खुप चांगले मित्र दिले आहेत.

हा क्षण आपल्यासाठी अत्यंत भावुक आहे असंही युवराजने म्हटलं आहे.

तसंच त्याने निवृत्तीच्या वेळी आपल्या गुरूंचे आणि आई वडिलांचे आभार मानले आहेत.

युवराज सिंह क्रिकेट जगतातला हिरो

युवराज सिंहने भारताकडून आतापर्य़त 304 वन डे सामन्यात 8701 धावा केल्या आहेत.

यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय युवराजने 40 कसोटी सामन्यात 1900 धावा केल्या आहेत.

यामध्ये 3 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी 20 स्पेशालिस्ट युवराजने 58 सामन्यात 8 अर्धशतकांसह 1177 धावा केल्या आहेत.

भारताने जिंकलेल्या टी 20 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये युवराज सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

2019 च्या IPLमध्ये तो फक्त चार मॅच मध्ये दिसला होता.

 

 

 

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: