Sat. Aug 17th, 2019

झाकीर नाईकच्या मुसक्या आवळणार?

0Shares

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरु झाकीर नाईक विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात यावी, यासाठी एनआयएने तयारी सुरु केली.

 

यासाठी एनआयएने इंटरपोलला पत्र लिहिले. मनी लाँडरिंग केल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे.

 

नाईक संयुक्त अरब अमिरात किंवा सौदी अरेबियात लपून बसल्याचा संशय एनआयएला आहे. या प्रकरणात एनआयएला नाईकच्या मालकीच्या काही मालमत्ता आढळून आल्या आहेत.

 

यासोबतच त्याच्याकडून चालवल्या जात असलेल्या काही कंपन्यांची माहितीदेखील एनआयएला मिळाली. या कंपन्यांचे एकूण मूल्य 100 कोटींहून अधिक आहे.

 

एनआयएच्या न्यायालयाने झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. यासोबतच एनआयएच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचेदेखील न्यायालयाने म्हटले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *