Tue. May 21st, 2019

अपघातानंतर झरीन खानची औरंगाबादेत ‘ही’ नवी कॉण्ट्रोव्हर्सी!

0Shares

सलमान खान च्या ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. गोव्यातील अपघात प्रकरणातून बाहेर येते ना येते तोच झरीनचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद मध्ये एका शोरूम च्या उद्घाटनासाठी गेलेल्या झरीनला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

आपल्या प्रसिद्धीचा वापर करून अनेक सिनेस्टार वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेत असतात. अभिनेत्री झरीन खाननेसुद्धा औरंगाबादमधील कॅनॉट प्लेस नामक शोरूमच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली होती. मात्र या कार्यक्रमासाठी शोरूम मालकाने कुठलाही पोलीस बंदोबस्त न ठेवता खासगी बाउन्सर लावले होते. चाहत्यांची गर्दी अचानक वाढल्याने बाउन्सर आणि लोकांमध्ये बाचाबाची सुरु होऊन हाणामारी सुरु झाली.

यात खुद्द अभिनेत्री झरीनसुद्धा मागे राहिली नाही, तिनेही एका चाहत्याच्या कानशिलात वाजवली. त्यामुळे जमलेल्या लोकांमधील रोष वाढला आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जीवाच्या भीतीने झरीन खानला तब्बल दोन तास शोरूममध्येच अडकून पडावं लागलं. यावेळी संतप्त तरुणांनी कॅनॉट प्लेस मधील बॅरिकेट्स आणि उभ्या असलेल्या दुचाकी फोडल्या.

दोन दिवसांपूर्वीच झरीन खानच्या कारने एका युवकाला गोव्यामध्ये उडवले होते.

काय झाले होते नेमकं गोव्यामध्ये?
गोव्यात सुट्टी साठी गेलेल्या झरीन खान ची कार एका मोटारसायकल चालवणाऱ्या युवकाला धडकली. कारचा वेग खूप जास्त असल्याने त्या मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नितेश गोरल असं मृत्यू पावलेल्या 30 वर्षीयतरुणाचं नाव आहे.गोवा पोलीस अपघाताची पूर्ण तपासणी करत आहेत त्यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *