Tue. Sep 28th, 2021

काँग्रेस आमदाराचा शिवसेनेवर पक्षपाताचा आरोप

मुंबई: मुंबईतील काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेवर पक्षपाताचा आरोप केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वाद विवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

मुंबईतील वांद्रे पूर्व भागात गुरुवारी लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. झिशान सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटरवर मंत्री अनिल परब यांचा उदघाटनाच्या वेळचा फोटो शेअर करत शिवसेनेला सवाल विचारला आहे.
‘काल वांद्रे पूर्वे येथे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. मात्र मी येथील स्थानिक आमदार असूनही मला आमंत्रित करण्यात आले नाही. आपण लसीच्या बाबतीतसुद्धा राजकारण करणार आहेत का?’, असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

झिशान सिद्दीकी यांचं हे ट्विट प्रसारमाध्यमांवर चांगलंच व्हायरल होत आहे. ‘माझ्या विभागातल्या कार्यक्रमाला मलाच का बोलावत नाहीत’ या झिशान सिद्दीकी यांच्या सवालामुळे महाविकास आघाडीमधील वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

दरम्यान, ‘जय महाराष्ट्र’ने मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *