नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी! कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शून्यावर

नागपूर: नागपूरमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र नागपूरकरांनी यावर मात केली असून नागपूर शहरात शनिवारी कोरोनाचा एकही नवा रूग्ण आढळलेला नाही.
नागपूर शहरात पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेनंतर शहरात प्रथमच एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळलेला नाही. तर ग्रामीण भागात केवळ एकच कोरोनाबाधित आढळला आहे.
सहा महिन्यांपूर्वी कोरोनाच्या लाटेने नागपूर शहर आणि ग्रामीण भागात हाहाकार माजला होता. मात्र हळूहळू दुसर्या लाटेचा प्रकोपही ओसरण्यास सुरुवात झाली. दरम्यान शनिवारी दहा जण कोरोनावर यशस्वीरित्या मात करून घरीही परतले आहेत.