Sun. Aug 25th, 2019

किंग खानच्या झिरो सिनेमाचं ‘हुस्न परचम’ गाणं रिलीज

0Shares

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या झिरो सिनेमाचे ‘इश्कबाजी’ हे गाणं नुकताच रिलीज झालं होत, या धमाकेदार गाण्यानंतर आता या सिनेमाचं ‘हुस्न परचम’ हे दुसरं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात कॅटरीना कैफचा हॉट अंदाज प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या गाण्यात कॅटरीना सुपरस्टार बबीता कुमारीच्या रुपात दिसणार आहे.

रिलीजनंतर शाहरुख खानने हे गाणं आपल्या ट्विटरवरून चाहत्यांसोबत शेअर केलं आहे तसेच या गाण्यासोबत “दीवानों की ये भीड़ अब न होगी कम, आ गई है बबिता कुमारी लहराने परचम” असं ट्विटही शाहरुखने केलं आहे.

शाहरुख खान, कॅटरीना कैफ आणि अनुष्का शर्मा यांचा झिरो हा सिनेमा येत्या 21 डिसेंबरला प्रेक्षकांना मोठ्या पदड्यावर पाहायला मिळणार आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *