Fri. Apr 19th, 2019

आता Facebookवरून WhatsApp, Instagramवरही मॅसेज पाठवता येणार!

0Shares

फेसबुकची स्थिती गुगलच्या ऑर्कुटसारखी होऊ नये म्हणून फेसबूक नेहमी नवनवीन फिचर आणत असते. आता फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत.

ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवरूनही फेसबूकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. खरेतर फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्य़ाची तयारी करत आहे.

न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झुकरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत.

मॅसेज पाठिवण्याची ही प्रक्रिया एंड टू एंड एनक्रिप्टेड म्हणजे सुरक्षितच असणार आहे. ही प्रणाली आजही व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वापरली जाते, ज्यामुळे व्हॉट्सअॅपवरील मॅसेज कोणीही हॅक करू शकत नाही.

ही सुविधा कधी सुरु करणार याबाबत फेसबुकने अद्याप सांगितले नसले तरीही 2019 च्या शेवटी किंवा 2020 च्या सुरुवातीला सुर होण्याचे संकेत दिले आहेत.

फेसबुकने एका वक्तव्यामध्ये म्हटले आहे की, आम्ही मॅसेंजिंगचा अनुभव आणखी चांगला देऊ इच्छित आहोत.

या क्रॉस प्लॅटफॉर्म मॅसेंजिंग सुविधेचा एवढा परिणाम होणार आहे, की फेसबुकवर वेळ घालवणाऱ्या लोकांचे प्रमाण कमालीचे वाढणार आहे.

तसेच गुगलच्या मॅसेंजिंग आणि अ‍ॅपलच्या आय मॅसेजला टक्कर देऊ शकणार आहे. त्याचबरोबर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचे विलिनिकरणही होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *