उन्हाळ्यात रोज प्या बेल फळाचे ज्यूस

0
222

मुंबई, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : जर तुम्हाला तीव्र उष्णता आणि कडक उन्हाच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित राहायचे असेल, तर तुमच्या आहारात बेलचा रस समाविष्ट करा. उन्हाळ्यात बेल फळाचे ज्यूस आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी मानला जात नाही. बेल फळामध्ये बीटा-कॅरोटीन, प्रथिने, थायामिन, व्हिटॅमिन सी आणि रायबोफ्लेविन यांसारखे पोषक तत्त्व मुबलक प्रमाणात असतात. जे शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच उष्माघाताची शक्यताही कमी करते. उन्हाळ्यात बेल फळाचा रस पिल्याने आपल्याला कोणते आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळतात ते जाणून घेऊया.

बेल फळाचे ज्यूस पिण्याचे फायदे
डिहायड्रेशनपासून बचाव
उन्हाळ्यात उष्णतेची लाट आणि उन्हामुळे डिहायड्रेशनच्या समस्येने लोकांना सर्वात जास्त त्रास होतो. अशा स्थितीत बेल फळाचे ज्यूस प्यायल्याने शरीराला थंडावा तर मिळतोय शिवाय शरीर हायड्रेटही राहते. बेल फळाचे ज्यूसचे नियमित सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता देखील दूर होते.

चांगले पचन
बेल फळचे ज्यूस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. बेलाच्या थंड स्वभावामुळे पोटातील उष्णता शांत होते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

तोंडाच्या अल्सरपासून आराम
बेल फळाचे ज्यूस प्यायल्याने पोट थंड राहते. ज्यामुळे तोंडाच्या अल्सरपासून आराम मिळतो.

प्रतिकारशक्ती वाढवते
बेल फळाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. रोज एक ग्लास बेल फळाचे ज्यूस प्यायल्याने व्यक्ती रोग आणि संसर्गापासून दूर राहून वारंवार आजारी पडत नाही.

डायबिटीजमध्ये फायदेशीर
मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा बेल सरबत खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले लॅक्सेटिव्ह रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. शुगरच्या रुग्णांनी बेल फळाचे सरबत बनवताना साखर वापरू नये. तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर ते घेऊ शकता

वेट लॉसमध्ये फायदेशीर
बेल फळाचे ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यातील फायबरचे प्रमाण जास्त काळ पोट भरलेले ठेवते. त्यामुळे भूक कमी होते आणि व्यक्ती जास्त खाण्यापासून वाचते. जे वाढलेले वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!