कोरोना, जेएन वन आणि ओमिक्रॉनविषयीच्या प्रश्नांना तज्ज्ञांना दिलेली उत्तरे

0
498

Expert answers to questions about Corona, JN.1 and Omicron

प्रश्न १ : भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढीची काळजी करावी का ?

उत्तर : कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे. आजाराची तीव्रता आणि मृत्यूदर यात लक्षणीय घट झाली आहे. भारतात नव्याने कोरोना रुग्ण आढळत असले तरी हे रुग्ण वेळेत उपचार घेतल्यास बरे होतील अशा स्वरुपाचे आहेत. यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

प्रश्न २ : कोरोना विषाणूचे नवे स्वरुप अर्थात नवा व्हेरियंट आधीच्या व्हेरियंटपेक्षा वेगळा आहे का ? लक्षणे कशी आहेत ?

उत्तर : जेएन वनची (JN.1) लक्षणे ओमिक्रॉन (Omicron) प्रकारासारखीच आहेत. ताप येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे ही प्रमुख लक्षणे आहेत. काही विशेष प्रकरणांमध्ये अंगदुखी, अतिसार, पोटदुखी अशा स्वरुपाचे त्रास होतात.

प्रश्न ३ : लस घेणे आवश्यक आहे का ?

उत्तर : भारतात बहुसंख्य नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतले आहेत. काही जण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. यामुळे देशातील कोट्यवधी नागरिकांच्या शरीरात संसर्गाशी लढण्याची क्षमता विकसित झाली आहे.

प्रश्न ४ : कोणती खबरदारी घ्यावी?

उत्तर : सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे, तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेणे आणि वैयक्तिक स्वच्छता, हातपाय धुणे याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

प्रश्न ५ : लसचा बूस्टर डोस घ्यावा का ?

उत्तर : गंभीर आजारी असलेले, गंभीर आजारातून बरे झालेले, ज्येष्ठ नागरिक, परदेश दौऱ्यावर जाणार असलेले यांनी लसच्या बूस्टर डोसबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी सांगितले तरच लसचा बूस्टर डोस घ्या.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!