रालोआत सहभागी झाल्यावर ८ महिन्यांत पटेलांना दिलासा

0
85

मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : एअर इंडिया ही विमान कंपनी आर्थिक अडचणीत सापडण्यासाठी तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल पटेल कारणीभूत असल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरणात झालेल्या चौकशीअंती सीबीआयने प्रफुल पटेल यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचा निष्कर्ष काढला आणि अहवाल सादर केला. हा अहवाल स्वीकारण्यात आला. यामुळे एअर इंडिया घोटाळा प्रकरणात प्रफुल पटेलांना क्लीनचिट मिळाली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वात रालोआत सहभागी झाल्यानंतर प्रफुल पटेलांना दिलासा मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जुलै २०२३ मध्ये रालोआत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला. प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीच्या बहुसंख्य खासदारांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला. यानंतर आठ महिन्यांनी प्रफुल पटेलांना दिलासा मिळाला.

सध्या प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत आहेत. काही आठवड्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत असेल.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!