जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा

0
55

पुणे, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : जगातील २५६ देशांमध्ये जागतिक रंगभूमी दिन साजरा करतात. हा जागतिक रंगभूमी दिन पुण्याच्या गुरुस्कूल गुफानमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गुरुस्कूल गुफान या संस्थेने तीन छोट्या गोष्टी रंगभूमीवर सादर केल्या. ‘हल्ला’, ‘धुंदफुंद’, ‘खालचे नी वरचे’ अशा या तीन गोष्टी होत्या. या व्यतिरिक्त संस्थेने ‘पहिली ते चौथी’ या नाटकातून कवितांचे प्रकटीकरण तर ‘महिला दिन साजरा’ हे नाटक सादर केले. कलेतून समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन होते, असे प्राध्यापक देवदत्त पाठक या निमित्ताने म्हणाले. या कार्यक्रमात मिलिंद केळकर यांनी नाट्यसंदेशाचे वाचन केले. तर, प्रथमेश आणि प्रांजली इंगळे, आलोक आणि अक्षता जोगदनकर, सायली ,आकांक्षा, अंजली चव्हाण, अर्णव देशपांडे ,धनश्री गवस ,आर्या करपे ,ऋतुजा केळकर यांच्या सहभागामुळे जागतिक रंगभूमी दिवस उत्साहात साजरा करण्यात संस्थेला यश मिळाले.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!