गोविंदा विरुद्ध अमोल कीर्तीकर लढत होणार ?

0
103

मुंबई, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी गोविंदा यांचे स्वागत केले. शिवसेनेच्या तिकिटावर गोविंदा वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ही शक्यता प्रत्यक्षात आल्यास गोविंदा हे शिउबाठाच्या अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात दिसतील.

गोविंदा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर २००४ मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पण खासदार झाल्यानंतर गोविंदा संसदेत कमी वेळा दिसले. ते मतदारसंघात संपर्कासाठी उपलब्ध नसल्याची तक्रार स्थानिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पण करू लागले. अखेर २००८ मध्ये काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले. यानंतर गोविंदा यांनी राजकारण सोडले. आता शिवसेनेच्या माध्यमातून गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात आले आहेत.

२००४ – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ
गोविंदा, काँग्रेस विरुद्ध राम नाईक, भाजपा
निकाल : गोविंदा, काँग्रेस

२००८ – गोविंदाने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला

२०२४ – गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश

२०२४ – शक्यता
वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
गोविंदा, शिवसेना विरुद्ध अमोल कीर्तीकर, शिउबाठा

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!