Saturday, July 27, 2024 03:11:59 PM

Modi in Kalyan
मोदींचे उद्धवना आव्हान

नकली शिवसेनेने राहुल गांधींकडून सावरकरांबद्दल पाच वाक्य वदवून घ्यावी, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना दिले.

मोदींचे उद्धवना आव्हान
Narendra Modi

कल्याण, १५ मे २०२४, प्रतिनिधी : नकली शिवसेनेने राहुल गांधींकडून सावरकरांबद्दल पाच वाक्य वदवून घ्यावी, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना दिले. कल्याण येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी उद्धव यांना हे आव्हान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'काँग्रेसची मानसिकता मुसलमानांच्या लांगुलचालनाची राहिली आहे. पण बाळासाहेबांबद्दल बोलणारेही काँग्रेसचा कुर्ता पकडून उभे आहेत. काँग्रेस दहशतवाद्यांचे समर्थन करते आणि नकली शिवसेना त्यांच्यासोबत उभी आहे'; असा घणाघात मोदींनी केला. 


Eknath Shinde
कोल्हापूरकरांना मदत करण्याचे प्रशासनाला निर्देश

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली. आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

ROHAN JUVEKAR

कोल्हापूरकरांना मदत करण्याचे प्रशासनाला निर्देश

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली. आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. 

मुख्यमंत्री शिंदे हे निती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्ली येथे आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करुन पूरपरिस्थिती, पावसाची सद्यस्थिती आणि मदत व बचावकार्यासंदर्भात माहिती घेतली. 

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच काल धरणक्षेत्रात झालेला पाऊस लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी  दिल्या. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये सर्व सुविधा पुरवणे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची दोन पथके तसेच भारतीय सेनेचे पथकही मदतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवावे. धरणांमधून होणारा विसर्ग लक्षात घेवून अलमट्टी धरण प्रशासनाशी संपर्कात राहून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.