Thursday, July 10, 2025 04:49:56 AM

महेश राऊतला हंगामी जामीन

भीमा कोरेगाव-एल्गार परिषद कट प्रकरणातील आरोपी महेश राऊतला आजीच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याकरिता दोन आठवड्यांचा हंगामी सशर्त जामीन देण्यात आला आहे.

महेश राऊतला हंगामी जामीन

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव-एल्गार परिषद कट प्रकरणातील आरोपी महेश राऊतला आजीच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याकरिता दोन आठवड्यांचा हंगामी सशर्त जामीन देण्यात आला आहे. हंगामी जामिनाचा कालावधी २६ जूनपासून सुरू होईल आणि १० जुलै रोजी संपणार आहे. जामिनाची मुदत संपताच आरोपीला पुन्हा तुरुंगात हजर व्हावे लागेल. महेश राऊतच्या जामिनासाठी अटी ठरवण्याचे काम एनआयए न्यायालय करणार आहे.


सम्बन्धित सामग्री